तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक येथे खासदार निधीतून विंधन विहीर खोदून इलेक्ट्रिक मोटार व पाण्याची टाकी बसवून विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय शिवसेनेने दूर केले आहे. यासाठी तब्बल दीड लाख रूपयांचा निधी खासदार विनायक राऊत यांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की मळेवाड जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे पिण्याच्या पाण्याची गरज नसल्याने तेथील ग्रामस्थांची गेली कित्येक वर्षापासूनची मागणी होती ही मागणी खासदार विनायक राऊत यांच्या कानावर पडतात त्यांनी तात्काळ यासाठी निधी उपलब्ध करून दिला विद्यार्थ्यांची गैरसोय मिटल्याने तेथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त होत आहे.
