जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मळगाव ग्रामसचिवालय आवारात वृक्षारोपण

सावंतवाडी सहदेव राऊळ : सावंतवाडी : तालुक्यातील ग्राम स्वच्छता पुरस्कार विजेता असलेल्या मळगाव ग्रामपंचायतीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ग्राम सचिवालय इमारतीच्या आवारात रविवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, मळगाव वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक रमेश पाटील, वैशाली वाघमारे, वनसेवक गोपाळ सावंत, वनसेवक रामचंद्र रेडकर, ग्रामस्थ ज्ञानदेव मळगावकर, योगेश पटेल, तुषार पटेल, लक्ष्मण तेली, विनोद पटेल, राजेश पटेल, हेमंत राऊळ, निलेश चव्हाण, शिवप्रसाद गावकर, सुंदर सावळ, राजन राऊळ,विद्या कळगुटकर, अजय मांजरेकर, अशोक राऊळ, जय जाधव आदी उपस्थित होते.;या वृक्षारोपणांतर्गत चाफा, धूप, सुरंगी, बेल, कवठी चाफा आदी औषधी व पुजा उपयुक्त झाडे व वेलींची झाडांची लागवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page