शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण…

हिंद मराठा संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी केला पुष्पहार अर्पण

कुडाळ ता.०६-: हिंदुस्तानचे प्रेरणास्थान शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा 347वर्ष पूर्ण होत आहेत.त्या 348 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्यास हिंद मराठा संघ सिंधुदुर्गच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी हिंद-मराठा महासंघ(रजि) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्यावतीने हा पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब,सचिव दादा साईल,कार्यकारणी सदस्य प्रसाद गावडे,संतोष वालावलकर,संदीप साटम,सौ.सुप्रिया वालावलकर,देवेंद्र सामंत,योगेश घाडी,पांडू मालवणकर,तुषार सावंत,आनंद उर्फ दादा परब,तेजस माने,साई प्रसाद भोई आदी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज की जय.अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page