आडवली येथील यादव हायस्कुलला माजी विद्यार्थ्यांकडून मदत

मालवण ता.०४-:* सर्वोदय एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित आडवली येथील आर. ए. यादव हायस्कूलच्या १९७१ बॅचच्या सात माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी शैक्षणिक मदत म्हणून ५१ हजार १ रुपयांची देणगी धनादेशाद्वारे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे उपाध्यक्ष सुभाष साटम यांच्याकडे सुपूर्द केली.

प्रशालेचे माजी विद्यार्थी व सर्वोदय एजुकेशन सोसायटी, मुंबईचे सदस्य प्रमोद साटम व त्यांच्या बॅचमधील महादेव हिर्लेकर, सुनंदा साटम, छाया बाणावलीकर, संजीवनी कुबल, व्ही. बी. परब, नरेंद्र साटम या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या देणगीबद्दल सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी, आडवली शाळा समितीचे अध्यक्ष, सदस्य, निमंत्रित सदस्य, समिती पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page