रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा
कणकवली ता.०२-:* रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा निलम कंन्ट्रीसाईट, कणकवली येथे संपन्न झाला. रोट. श्रद्धा पाटकर यांची २०२१-२२ ह्या वर्षासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर क्लबच्या सचिवपदी रोट. मिहीर तांबे व खजिनदारपदी रोट. नमिता घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. आय. पी. डी. आर. आर. रोट. साहिल गांधी हे सोहळ्याचे पदग्रहण अधिकारी म्हणून लाभले होते.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे अध्यक्ष विद्याधर तायशेटे, सचिव वर्षा बांदेकर, महेंद्रकुमार मूरकर, शशिकांत चव्हाण, दादा कुडतरकर, डि. आर. आर. रोट. विशाखा पेडणेकर, डि. आर. आर. इलेक्ट रोट. अनिकेत जाधव, डि. झेड. आर. निहाल नाईक, आय. पी. झे. आर. आर. रोट. स्वप्निल परब आदी उपस्थित होते. यावेळी श्रद्धा पाटकर यांनी क्लब द्वारे चालविलेल्या “तृष्णा पाणपोई” विषयी माहिती दिली. रोट. साहिल गांधी यांनी क्लबच्या कामाविषयी गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमावेळी कणकवलीतील 100 कि. मी. सायकलिंग करणाऱ्या नितांत राजन चव्हाण याचा सत्कार करण्यात आला. तसेच साहिल गांधी, विशाखा पेडणेकर व अनिकेत जाधव यांचा देखील शाल, श्रीफळ व भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे पदाधिकारी, तसेच झेड. आर. आर. इलेक्ट रोट. दुर्गेश पाटिल, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे रोट. प्रितीश लाड, रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष रोट. पृथ्वीराज चव्हाण, रोट. मिहिर, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यांनी तर आभार प्रदर्शन मिहीर तांबे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेश कदम यांनी अन आभार प्रदर्शन मिहीर तांबे यांनी केले .
