महाराणा प्रताप यांचा आदर्श भावी पिढीने जोपासणे आवश्यक:तुळशीदास रावराणे

कणकवली येथे महाराणा प्रताप जयंती साजरी

कणकवली ता.०२-:* समाजाची उन्नती व समाज संघटन चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे महाराणा प्रताप यांचा आदर्श व कार्य भावी पिढीसमोर रहावा आणि त्यातून त्यानी बोध घ्यावा यासाठी समाजाचा मेळावा घेऊन यातून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन महाराणा प्रताप जयंती कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे यांनी केले.

कणकवली तालुका राणा समाजच्यावतीने महान योद्धे महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राणे समाजाची कुलस्वामिनी महेश्वरी व महान योद्धे महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे, पांडुरंग राणे ,चंद्रशेखर राणे ,भास्कर राणे ,अनमोल रावराणे, सत्यवान राणे, तेजस राणे ,प्रदीप राणे, अभय राणे, प्रशांत राणे, महेश राणे तसेच अनेक नेते उपस्थित होते

You cannot copy content of this page