आ. वैभव नाईक यांनी मंजूर केलेला रस्ता हळवल ग्रा.प.च्या मालकीचाच

संतोष कानडे यांनी केलेले आरोप खोटे:सरपंच दीपक गुरव

*⚡कणकवली ता.०१-:* हळवल गावातील सर्व्हे नं. ७१ व ७२ हि जमीन जरी आमदार वैभव नाईक यांच्या नावे असली तरी या जमिनीतून जाणारा रस्ता त्यांनी हळवल ग्रामपंचायतकडे हस्तांतरित केला आहे. या रस्त्याची ग्रा. प. सदरी २३ नंबर ला नोंद असून सदर रस्ता ग्रा. प. च्या मालकीचा आहे. ग्रामपंचायतच्या मागणी नुसार आमदार वैभव नाईक यांनी सदर रस्त्याच्या डांबरीकारणासाठी व रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधणीसाठी २५-१५ ग्रामविकास निधी अंतर्गत एकूण चार कामांसाठी २० लाख रु. निधी मंजूर केला आहे.

या कामांचा नागरिकांना लाभ होणार आहे. त्यात आ. वैभव नाईक यांनी कोणताही वैयक्तिक स्वार्थ साधलेला नाही त्यामुळे भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी आ. वैभव नाईक व हळवल ग्रा. प. वर केलेले आरोप खोटे आहेत. असा खुलासा हळवल गावचे सरपंच दीपक गुरव यांनी केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेला रस्ता हळवल सर्व्हे नं. ७१ व ७२ ते हळवल देवतळी पर्यंत जाणारा जोडरस्ता आहे. हळवल देवतळी हे धार्मिक स्थळ असून हळवल ग्रामस्थांच्या श्रद्धेचा विषय असल्याने प्रामुख्याने या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याचे व गटाराचे काम मंजूर केलेले आहे.

कणकवली माऊलीची कोंड येथे नदीवर जुन्या पुलाच्याठिकाणी नवीन पूल उभारणी करण्यासाठी पाठपुरावा सुरु असून आ. वैभव नाईक यांनी मंजूर केलेला रस्ता या पुलाला जोडणारा आहे. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नियोजित असलेली नळपाणी योजना याच मार्गावरून जाणार आहे. त्यामुळे देवतळी रस्त्याची उपयुक्तता जाणून घेऊन ग्रामपंचायतच्या मागणीनुसार आ. वैभव नाईक यांनी सदर रस्त्याचे काम मंजूर केले आहे. संतोष कानडे यांनी आरोप केल्याप्रमाणे ८० लाखाची कोणतीही कामे सर्व्हे नं. ७१ व ७२ मध्ये मंजूर नाहीत रस्ता व गटार मिळून केवळ २० लाखाची मंजूर असून त्याचे निविदा प्रक्रिया झालेली आहे.अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करणाऱ्या संतोष कानडे यांच्या माहितीसाठी निवदेबाबतचे सर्व कागदपत्र सादर करीत आहे.

त्याचबरॊबर आमदार वैभव नाईक यांनी हळवल परबवाडी येथे स्ट्रीट लाईट साठी २ लाख मंजूर केले आहेत. हळवल गावच्या विकासात आ. वैभव नाईक यांचे मोठे योगदान आहे. ते आमदार झाल्यानंतर सुमारे २ कोटी पेक्षा जास्त निधी त्यांनी हळवल गावासाठी शासनाकडून मंजूर करून दिला आहे . तसेच नवीन रास्त धान्य दुकान, हळवल तलाठी सजा , मुख्यमंत्री ग्रामसडक मधून रस्ता, जलयुक्तशिवार मधून शिवकालीन तळी,विहिरी, गावात स्ट्रीट लाईट, कॉजवे, हायमास्ट ,अंगणवाडीच्या दोन नवीन इमारती,कणकवली कळसुली मुख्य रस्ता अशी अनेक विकास कामे आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून हळवल गावात झाली आहेत. त्यामुळे आ. वैभव नाईक व हळवल ग्रा. प. वर आरोप करणाऱ्यांनी आरोपाची स्पर्धा न करता विकासकामांची स्पर्धा करावी असे आवाहन सरपंच दीपक गुरव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page