खासदार अनिल देसाई; श्री देव रामेश्वर वाचनालयासाठी १० लाखाचा अतिरिक्त निधी देणार ..
मालवण दि प्रतिनिधी जीवनामध्ये पुस्तकी ज्ञानाला महत्त्वाचे स्थान असून वाचनाने माणूस समृद्ध बनतो. ६५ वर्षापूर्वी कांदळगाव सारख्या छोटेखानी गावात श्री देव रामेश्वर वाचनालय सुरू करून वाचन संस्कृती जपण्याचे काम कांदळगाव वासीय करीत आहेत ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे. आज वाचनालयासाठी पंधरा लाखाचा खासदार निधी दिला असला तरी या वाचनालयासाठी आणखी दहा लाख रुपयाचा आपण आपल्या फंडातून देऊ अशी ग्वाही खासदार अनिल देसाई यांनी कांदळगाव येथे बोलताना दिली. कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय ह्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या ग्रंथालयाच्या नूतन वास्तूसाठी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनीही १५ लाख रुपये खासदार निधी उपलब्ध करून दिला.
हा निधी मिळण्यासाठी ओझर विद्यामंदिर कांदळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब यानी विशेष मेहनत घेतली. या निमित्ताने ग्रंथालयाच्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर कुडाळ- मालवण आमदार वैभव नाईक, उद्योजक तथा मसूरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दीपक परब, शिवसेना नेते गुरुनाथ खोत, संदेश पारकर, ओझर विद्या मंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एस परब, मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक छोटू देसाई, कांदळगाव सरपंच उमदी परब, ग्रंथालयाचे अध्यक्ष उदय परब, उपाध्यक्ष मधुसूदन परुळेकर, कार्यवाह प्रविण पारकर, सहकार्यवाह तथा उपसरपंच आनंद आयकर , खजिनदार गजानन सुर्वे, हिशोब तपासनीस प्रविण परब, सदस्य तथा श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उदय राणे, विभावरी मेस्त्री, स्वाती बेलवलकर, अर्चना कोदे, कांदळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन प्रसाद भोगले, ग्रंथपाल साक्षी मेस्त्री, कर्मचारी महेश साळकर, ओझर विद्यामंदिरचे साहाय्यक शिक्षक डी.डी. जाधव, रोहन राणे, स्वप्निल परुळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी खासदार अनिल देसाई यांनी १९५६ साली या वाचनालयाची सुरुवात ज्यांनी केली त्या मंडळीला वाचनाची किती आवड होती हे या कृतीतून दिसून येते आणि हे तेवढेच वाखाणण्याजोगे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की ‘वाचाल तर वाचाल’ आणि याचप्रमाणे कांदळगाव वासीयांनी ही भूमिका आपल्या व लोकांच्या मनामध्ये साकारली आपल्याला ही वाचन संस्कृती अशीच पुढे चालू ठेवायची आहे. आधुनिक जीवनामध्ये पुस्तकातील ज्ञान खूप महत्त्वाचे आहे आणि यासाठी वाचनालयाची गोडी सर्वांमध्ये निर्माण व्हावी असे ते म्हणाले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष श्री उदय परब यांनी या वाचनालयासाठी खासदार अनिल देसाई यांनी पंधरा लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानताना वाचनालयाचा एक हॉल उभारण्यासाठी निधी जर उपलब्ध झाला तर येथे होणारे कार्यक्रम देखील त्या हॉल मध्ये घेतले जाऊ शकतात आणि हा हॉल आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण पारकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडूरंग राणे यांनी तर आभार आनंद आयकर यांनी मानले.
