मालवण ता.२९-:* सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर हे उद्या सोमवार दि. ३० मे रोजी सकाळी ९ वाजता मालवण नगरपालिकेला भेट देऊन सिंधुरत्न योजनेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आम. वैभव नाईक हे देखील उपस्थित राहणार आहेत.
मालवण शहरातील सर्व मच्छीमार, व्यापारी जलक्रीडाव्यवसायिक आणि बचत गटाच्या महिला प्रतिनिधी यांनी सिंधुरत्न योजनेच्या अनुषंगाने आपले विचार मांडण्यासाठी तसेच प्रस्ताव देण्यासाठी नगरपालिका सभागृहामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण न प चे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे
