भरधाव आयशरची ओसरगाव टोल नाक्यावर वाहनास धडक;

अपघातात दोघे गंभीर जखमी

कणकवली ता.२८-:* मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव टोलनाका येथे गोवा ते मुंबई लेनवर शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.रस्त्यावर अज्ञात वाहनास मागून भरधाव येणाऱ्या आयशर (एम एच 08 डब्लू 8397) या वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात आयशर गाडीतील दोघे सहप्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातानंतर चालक फरार झाला आहे. अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. जिल्हा वाहतूक पोलिस शाखेचे एएसआय प्रदीप पुजारे, हेड कॉ्स्टेबल सुशांत पवार, पोलीस नाईक धुरी, वागतकर व नाईक यांनी अपघातस्थळी धाव घेत गाडीत अडकलेले जखमी प्रवासी प्रवीण संजय कोंडगे (वय 29, रा. चांदणी चौक बावधन पुणे) व पोपट शिवाजी साळुंखे (वय 34 रा. कराड जि. सातारा) यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पुजारे, हवालदार सुशांत पवार, पोलीस नाईक श्री. धुरी, वागतकर, श्री. नाईक आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली.

अपघातात आयशरच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला होता. पत्रा वाकवून आत अडकलेल्या दोघांना वाहतूक पोलिसांनी बाहेर काढले व 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. कोंडगे यांची प्रकृती गंभीर असल्याची महिती समोर आली आहे. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघात बाबत कणकवली पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे. ठाणे व मुंबई कंट्रोल यांनाही माहिती देण्यात आली आहे. ए. एस जाधव सहा. पोलीस उपनिरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र कसाल यांच्या माध्यमातून याबाबत माहिती प्राप्त झाली आहे.

You cannot copy content of this page