दीपक पाटकर यांच्याकडून महापुरुष देवस्थानला बेंचेस प्रदान

*⚡मालवण ता.२५-:* मालवण शहरातील रेवतळे येथील महापुरुष देवस्थानाला माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या प्रयत्नांतून जेवणासाठी १५ बेंचेस (बाकडे) सुपूर्द करण्यात आले आहेत. येथील महापुरुष बाळगोपाळ मित्रमंडळाच्या मागणीनुसार श्री. पाटकर यांनी ही पूर्तता केली आहे. ऋतुराज एम्पायरचे ऋतुराज कांबळी यांनी हे बेंचेस उपलब्ध करून दिले आहेत.

यावेळी ऋतुराज एम्पायरचे ऋतुराज कांबळी, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह माजी नगरसेवक विलास मुणगेकर, रमेश गावकर, राजन गावकर, सुधीर हळदणकर, अजित गवंडे, आश्विन गावकर, मोहन साळवी, निलेश शिरोडकर, नितीन खानोलकर, नरेंद्र आरोंदेकर, विद्याधर राणे, संजय साळवी यांच्यासह महापुरुष बाळगोपाळ मित्रमंडळाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीची दीपक पाटकर यांनी पूर्तता केल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page