*⚡कुडाळ ता.१९-:* कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत युवासेनेेचे जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे उमेदवार मंदार शिरसाट यांनी विजय संपादन केल्याने सावंतवाडी युवासेनेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी युवासेना सावंतवाडी तालुका प्रमुख योगेश नाईक, तालुका समन्वयक तथा वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे, ओवळीये सरपंच विनायक सावंत, आरोस ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक, वेंगुर्ला युवासेना प्रमुख पकंज शिरसाठ, कुडाळ शहर प्रमुख संदीप महाडेश्वर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
