नांदगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांचे आवाहन
*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यक्तींनी कोरोनाचेआजपर्यंत पहिला डोस 85 % आसपास तर दुसरा 65% च्या आसपास झाले आहे. तरी राहीलेल्या व्यक्तींनी दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन नांदगाव प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांनी केले आहे.
तसेच वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर कोरोना संबंधित शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यात प्रामुख्याने गर्दी ठिकाणी जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर करावा तसेच सध्या हीवाळा सुरू आहे यामुळे वातावरणात बदल झाले काय सर्दी खोकला ताप हे होत असते . मात्र जास्त काळ ताप व कोरोना संबंधित लक्षणे दिसू लागताच प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून न घाबरता तपासणी करून घ्यावी . असे आवाहन नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांनी केले आहे.
