*⚡सावंतवाडी ता.१७-: माजगाव येथील जागृत श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या १८ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी देवीवर अभिषेक, ब्राम्हणांच्या साक्षीने धार्मिक विधिवत पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत.
रात्री भव्य पालखी मिरवणुकीनंतर पार्सेकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहेत. भाविकांनी कोरोना नियमावलीचे पालन करून जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.
