उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर उमेदवारी;भाजपची उमेदवारी दाखल
*⚡ओरोस ता १३-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड आज होत असून सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यासाठी भाजपचे सर्व ११ सदस्य निवडणूक सभागृहात दाखल झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे चार संचालक दाखल झाले आहेत.भाजपच्यावतीने मनीष दळवी यांनी अध्यक्ष पदासाठी व उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे भाजप नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा धक्कातंत्र वावरत प्रबळ दावेदार असलेल्या अतुल काळसेकर यांनी उपाध्यक्ष पदी ढकलत मनीष दळवी यांनी अध्यक्ष पदाची संधी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी मतदान झाले हिते. ३१ रोजी मतमोजणी झाली होती. यावेळी भाजप अकरा तर महाविकास आघाडी आठ संचालक निवडून आले होते. त्यामुळे भाजपचे बहुमत सिद्ध झाले होते. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. केंद्रीयमंत्री नारायण राणे कोणाला संधी देतात ? याची उत्सुकता होती. त्यासाठी केंद्रीयमंत्री राणे यांनी बुधवारी सर्व संचालकांची बैठक घेतली होती. मात्र, नावे जाहीर केली होती.
आज सिंधुदुर्गनगरी येथील जिखा बँक प्रधान कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ सुरू झाली आहे. त्यानुसार भाजप कडून मनीष दळवी यांनी अध्यक्ष पदासाठी तर अतुल काळसेकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. अतुल काळसेकर यांचे अध्यक्ष पदासाठी नाव आघाडीवर होते. मात्र, नारायण राणे यांनी पुन्हा धक्कातंत्र वापरत मनीष दळवी याना संधी दिली आहे. तर अतुल काळसेकर यांना उपाध्यक्ष पदासाठी संधी दिली आहे.
