सिंधुदुर्ग केंद्रावर सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलली

कोरोना पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय : परिस्थिती निवळताच नवीन वेळापत्रकाची होणार घोषणा

मालवण ता.१३-: ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून राज्यनाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी, अशी अनेक संघांनी ई मेल द्वारे व दूरध्वनीवरून केलेली विनंती लक्षात घेऊन, येत्या २५ जानेवारी पासून सिंधुदुर्ग केंद्रावर सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे.

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात येत आहे अशी माहिती संजय शिंदे, समन्वयक केंद्र सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page