कणकवली ता.१२-: खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांच्या चेअरमन पदाच्या निवडीच्या पहिल्याच मासिक सभेत संस्थेचे संचालक व जि. प. सदस्य रवींद्र कांतीलाल जठार उर्फ बाळा जठार यांची खारेपाटण सोसायटीच्या चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.तर व्हाईस चेअरमन पदी संस्थेचे सुरेंद्र काशीनाथ कोरगावकर यांची निवड करण्यात आली.
खारेपाटण सोसायटीच्या कार्यलयात आज झालेल्या चेअरमनपदाच्या निवडी करिता सभेच्या अध्यासी अधिकारी म्हणून सहकारी संस्था कणकवलीच्या अधिकारी श्रीम.सुनीता आशिष भोगले या उपस्थित होत्या. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण सोसायटीच्या चेअरमनपदाची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी माजी महिला बाल कल्याण सभापती श्रीम. रत्नप्रभा वळंजू,कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, रवींद्र शेट्ये,वारगाव उपसरपंच नाना शेट्ये,नडगिवे सरपंच अमित मांजरेकर,उपसरपंच अरुण कर्ले, कुरंगावणे उपसरपंच पप्पू ब्रम्हदंडे ,इरफान मुल्ला, किशोर माळवदे,नंदू कोरगावकर आदी मान्यवर यांनी नूतन अध्यक्षांचे व उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.तर ता निवडी दरम्यान खारेपाटण सोसायटीचे विद्यमान संचालक श्री विजय देसाई,इस्माईल मुकादम, एकनाथ कोकाटे,श्रीधर गुरव,संतोष सरफरे,अशोक पाटील,सौ तृप्ती माळवदे,सौ उज्वला चिके,मंगेश गुरव,रघुनाथ राणे,मोहन पगारे आदी उवस्थित होते. खारेपाटण सोसायटीचे विद्यमान नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी “संस्थेच्या हिताच्या दृष्टीने संचालक व सभासदांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतले जातील असे सांगितले. तर आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला अध्यक्षपदी निवड केलात.आपल्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. येथील सभासद शेतकरी बांधवांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार असून खारेपाटण सोसायटीचे नाव राज्यात अग्रेसर राहिल असे कार्य आपण येत्या काळात करणार असल्याचे खारेपाटण सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी यावेळी सांगितले.
