जिल्हा बँकेसाठी सावंतवाडीत ९९.५२% मतदान

सावंतवाडी, ता.३०: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील २१२ पैकी २११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९९.५२% इतके मतदान झाले. एक मतदार बाहेरगावी असल्यामुळे अनुपस्थित राहिला. एकूण २३ महिला आणि १८८ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला.

येथील तहसीलदार कार्यालयात सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु असलेली ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाविकास आघाडी व भाजप या दोन्ही बुथांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात गर्दी पांगवताना पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

You cannot copy content of this page