वैभववाडी-उंबर्डे रस्त्याचे काम निकृष्ट

वाहनचालक-प्रवाशानी केले रास्ता रोखो

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी – उंबर्डे मार्गावर सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने वाहनचालक व प्रवाशांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल होताच आंदोलन कर्त्यांनी काढता पाय घेतला. पोलिसांनी मार्ग वाहतूकीस पुर्ववत केला.

कुसूर पिंपळवाडी नजीक डांबरीकरणाचे काम सुरू आहे. डांबर न घालताच खडी पसरणीचे काम केले जात आहे. असा आरोप वाहनचालक व प्रवाशांनी केला. व घटनास्थळी रास्ता रोको केला. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक प्रविण देसाई यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. व रस्ता वाहतुकीस खुला केला. अचानक रस्ता रोखणाऱ्या चालकांना व प्रवाशांना पोलिसांनी सज्जड दम दिला. फोटो – कुसुर येथे वाहनचालकांचे रास्ता रोको आंदोलन छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page