ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे ६ जानेवारीला उपोषण

गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

*⚡सावंतवाडी ता.२९-:* कोरोना काळात काम करणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्त्यातील उर्वरित रक्कम मिळण्यासाठी ६ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष हनुमान केदार यांनी दिली आहे. याबाबतचे निवेदन सावंतवाडी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.

कोरोना काळात काम करणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नियमित वेतनाबरोबर १००० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासन आदेश आहेत. मात्र, केवळ एकदाच १००० रुपये देण्यात आले. या शासन आदेशाचा काही ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी यांनी चुकीचा अर्थ लावून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे नुकसान केलेले आहे, असा संघटनेने आरोप केला आहे. शासन आदेशाप्रमाणे सुमारे १८००० रुपये फरक रक्कम मिळण्यासाठी सावंतवाङी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ६ जानेवारी २०२२ रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे तालुकाध्यक्ष केदार यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page