Headlines

दशावतार कला पहिली महिला पखवाज वादक भाविकाचा झरेबांबर येथे होणार सत्कार…

*दोडामार्ग ता.२८ सुमित दळवी-: दशावतार इतिहासात पहिली स्त्री पखवाज वादक ठरलेल्या खानोलीच्या भाविका खानोलकर हिचा दोडामार्ग झरेबांबर येथे सत्कार होणार असून हा सत्कार जिव्हाळा क्रियेशन व नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर यांच्यामार्फत होणार आहे.त्याचबरोबर दशावतार क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या दशावतार कलाकार व पत्रकार यांचाही सत्कार सोहळा यावेळी होणार आहे. हा सत्कार सोहळा बुधवार २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३०वाजता जागतेश्वर रंगमंच झरेबांबर गावठणवाडी या ठिकाणी होणार आहे.

गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळात कुमारी भविका खानोलकर ही पखवाज वादन करते, तिच्या पंखवाज वादनाने रसिक प्रेक्षक तृप्त होतात त्यासाठीच या सत्कार सोहळ्यानंतर या नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे, याचा आस्वाद घेण्याचे आवाहन जिव्हाळा क्रियेशनचे शंकर जाधव व नाईक दशावतार नाट्य मंडळाचे संचालक सागर नाईक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page