नाथ पै एकांकिका स्पर्धेत शालेय गटात ठोंब्या ठोंबीची गोष्टी प्रथम

शिरगावची तात्पर्य चौक द्वितीय तर कोल्हापूरची ऐसे नवल घडले तृतीय

*⚡कणकवली ता २८-:* वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या ४४ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेतील शालेय गटाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे . यास्पर्धेत कला संस्कृती कल्याण संघाच्या ठोंब्या ठोंबीची गोष्टी या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे .

शिरगाव हायस्कूल , शिरगाव संघाच्या तात्पर्य चौक या एकांकिकेला द्वितीय , तर शिंदे थिएटर अँकॅडमी , कोल्हापूर या संघाच्या ऐसे नवल घडले या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. बाबा वर्दम थिएटर संघाच्या जीर्णोद्धार या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे . या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे . उत्कृष्ट दिग्दर्शन – डॉ . राजेंद्र चव्हाण ( प्रथम ) , विजय घुले ( द्वितीय ) , ललिता शिंदे ( तृतीय ) , तांत्रिक अंगे – कला संस्कृती , कल्याण संघ ( प्रथम ) , शिंदे थिएटर अँकॅडमी , कोल्हापूर संघ ( द्वितीय ) , शिरगाव हायस्कूल , शिरगाव संघ ( तृतीय ) . अनिभय पुरुष – निषाद जाधव ( प्रथम ) , हर्षद आईर ( द्वितीय ) , सोहम मोहिते ( तृतीय ) अभियन स्त्री किरण शिंदे ( प्रथम ) , माही साटम ( द्वितीय ) , निमिषा मोराणकर ( तृतीय ) , उत्तेजनार्थ मान्वित कांबळे , स्वरा नाईक यांना मिळाले आहे . या स्पर्धेचे परीक्षण प्रदीप वैद्य , चित्तरंजन गिरी , आदिती गिरी यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page