*⚡दोडामार्ग ता.२४ सुमित दळवी-:* मांगेली-देऊळवाडी येथील श्री सातेरी देवीचा कुलाचार, आर्चा व पुनः प्रतिष्ठापना सोहळा येत्या २५ ते २७ डिसेंबरदरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मांगेली-देऊळवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २५ रोजी सकाळी ५.०० वा. काकड आरती, सकाळी ९.०० पासून पुण्यवाचन संकल्प, कलश स्थापना कलासंकोच होम (जलस्तंभ) तीर्थप्रसाद व महाप्र साद, सायं. ७.०० वा. आरती होईल. २६ ला सकाळी ५.०० वा. काकड आरती, ९.०० वा. पासून जलनिवास, स्थळशुद्धी, धान्यनिवास, शयन निवास यागशाळा प्रवेश, कौतुक बंधन, मातृक पूजा, गणआवाहन, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायं. ४.०० वा. वास्तूराक्षोपण, अष्टदिक्पालक बली, सायं. ७.०० वा. आरतीचा कार्यक्रम होणार आहे. २७ डिसेंबरला सकाळी ५.०० वा. काकड आरती, सकाळी ९.०० वा. पासून तत्वहोम, प्रतिष्ठापना होम, अष्टावधान सेवा, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायं. ७.०० वा. आरतीचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यास तालुक्यातील नागरिक व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मांगेली येथील श्री देवी सातेरी, केळबाय, रवळनाथ देवस्थान परिसर, मांगेली- देऊळवाडी ग्रामस्थ व बारा पंचायतन देवस्थान मानकरी यांनी केले आहे.
