राणे कुटुंबाचा विश्वासू शिलेदार म्हणजे “विशाल परब”

जिल्ह्याचे लक्षवेधी युवा नेतृत्व विशाल परब वाढदिवस विशेष

*⚡सावंतवाडी ता.१४-:* वाडोस सारख्या एका लहानशा गावातून येऊंन राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे युवा नेतृत्व आणि कट्टर राणे समर्थक म्हणजेच युवा उद्योजक विशाल प्रभाकर परब. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र ने घेतलेला हा धावता आढावा.कोकणचे नेते नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या पडत्या काळात देखील त्यांची साथ न सोडता, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहत श्री. परब यांनी राणे कुटुंबाला साथ दिली. त्यांच्या याच निष्ठेमुळे त्यानी राणे कुटुंबाच्या ह्रुदयात स्थान मिळवले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे मंत्री पद मिळताच थेट दिल्लीत जाऊन विशाल परब यांनी त्यांची भेट घेत. त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. मुंबई पासून, संपूर्ण कोकण पट्ट्यात ही यात्रा यशस्वी करण्यासाठी विशाल परब यांनी जोरदार तयारी केली. सर्वत्र नारायण राणे यांना शुभेच्छा देणारे हजारो बॅनर रस्त्यावर जागोजागी लावण्यात आले होते. सगळ्याच बॅनर वर एकच नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ते नाव म्हणजे विशाल परब. नारायण राणे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांनी आपली ओळख आज निर्माण केली आहे. घरची परिस्थिती हालाखीची असताना देखील त्यांनी आपला घराचाच क्रशरचा व्यवसाय सुरू करत त्यांनीं त्यात यश प्राप्त केले. विशाल परब यांचे प्राथमिक शिक्षण वाडोस शाळेत पूर्ण झाले. तर बारावी पर्यंतचे शिक्षण माणगाव येथील श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी येथील एस.पी. के कॉलेजमधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. समाजकार्य आणि राजकारणाचे संस्कार तर त्यांचावर त्यांच्या घरातच झाल्याने त्यांना त्यात आवड होती. २०१३ साली त्यांचा प्रेमविवाह सौ. वेदिका यांच्यासोबत झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांच्या पत्नी सौ. वेदिका परब यांच्या खंबीर साथीमुळे त्यांना अनेक उद्योग धंद्यात यश प्राप्त झाले. त्यांच्या भार्गवी आणि विराज या दोन मुलांमुळे त्यांच्या सुखात आणखी भर पडली होती. २०१४ च्या विधानसभेत कुडाळ – मालवण मतदार संघात नारायण राणे यांचा तर लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा अनपेक्षित असा झालेला पराभव त्यांच्या फारच जिव्हारी लागला होता. या काळात राणे यांची साथ सोडून अनेक दिग्गज नेते गेले. परंतु, राणे कुटुंब आपले दैवत असून, काहीही झाले तरी त्यांची साथ सोडणार नाही. अशी भूमिका विशाल परब यांनी घेत. राणे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माणगाव खोऱ्यात आपला राजकीय जम बसवत त्यानी आपल्या गावातील ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राजकारणासोबत समाजकारण करत त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या भागातील युवकांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून माणगाव खोऱ्यात वेंकिंज कंपनी आणून रोजगार निर्माण करण्यात त्याचे मोठे योगदान आहे. काही दिवसांपूर्वी ९ ऑक्टोंबर रोजी पार पडलेल्या चीपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी देखील जोरदार बॅनर बाजी करत. त्यानी या विमानतळाचे खरे शिल्पकार केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत. हे दाखवून दिले आहे. एका गरीब कुटुंबातून येऊन जिद्द, चिकाटी, मेहनत यांच्या बळावर उद्योजक क्षेत्रात त्यानी निर्माण केलेले आपले अस्तित्व हे अताचा युवा उद्योजकांना आयडॉल असेच आहे. आपण आपले काम प्रामाणिकपणे केले तर त्याचे प्रामाणिक फळ आपल्याला मिळते हे त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ग्लोबल महाराष्ट्र कडून हार्दिक शुभेच्छा…

You cannot copy content of this page