खारेपाटण येथे आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

*💫कणकवली दि.१४-:* शिवसेना युवा सेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरणमंत्री नाम. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस खारेपाटण शिवसेना विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मास्क आणि फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण चेकपोस्ट येथे कोविड काळात आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस ,महसूल आणि शिक्षक कर्मचारी यांचा सत्कार शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख गीतेश कडू,शिवसेना विभागप्रमुख महेश कोळसुलकर,युवा सेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर,युवा सेना विभाग प्रमुख तेजस राऊत,खारेपाटण शिवसेना शाखा प्रमुख शिवाजी राऊत,संतोष गाठे,गिरीश पाटणकर,सुजय पाटणकर,भूषण कोळसुलकर,आदिनाथ शेट्ये,गौरव शेलार आदी युवा सैनिक उपस्थित होते. तसेच आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुलच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

You cannot copy content of this page