मालवण मनसे:जंतुनाशक फवारणी, रुग्णाना फळ वाटप
मालवण दि प्रतिनिधी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मालवण तालुका मनसेतर्फे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून श्री ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सॅनिटायझर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच हॉस्पिटलमधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे वाघवणे येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या ठिकाणी लस घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश अंधारी, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, चौके आरोग्य केंद्राचे डॉ. प्रणव पोळ,नितीन खानोलकर, मालवण महिला अध्यक्षा राधिका गावडे, निखिल गावडे, प्रतीक कुबल, साईराज चव्हाण, सचिन गावडे, दिनेश कदम, प्रतीक पार्टे, सुनील पेढरकर तसेच आरोग्य सेविका सोनाली सुतार, आरोग्य सहायक आर. एस. रणसिंग,आरोग्य सेवक ए. एस. वाईरकर आदी उपस्थित होते. कोरोना महामारी काळात तालुक्यात मनसेकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क, पीपीई किट, गरजू रुग्णांना मदत, रुग्णांना फळे वाटप, विविध सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझिंग करणे आदी उपक्रम राबविण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देखील मनसेने सामाजिक बांधिलकी जोपासली असून यापुढेही मनसेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील असे विनोद सांडव यांनी सांगितले. मनसेच्या या सामाजिक कार्याबद्दल उपस्थित ग्रामस्थानी आभार मानले.
