उद्योजक प्रशांत मेस्त्री यांचा इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजी यांच्या सहकार्याने पुढाकार
मालवण दि प्रतिनिधी कोरोना काळात औषधे, सँनिटायझरची कमतरता भासू नये या उद्देशाने चिंदर सडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी सुविधा इंस्ट्यूट्यूट आँफ टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे वैद्यकीय साहित्य आणि औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा चे डॉ शामराव जाधव यांच्या कडे सुपूर्द केली. यावेळी त्यांच्या सोबत आरोग्य कर्मचारी संदिप परब,वसंत मेस्त्री, संतोष मेस्त्री, आरोग्य सेविका आदी उपस्थित होते. यावेळी प्रकाश मेस्त्री यांच्या सहकार्याने आचरा गावबंदी साठी गावाच्या सीमेवर सुरक्षेसाठी कार्यरत ग्रामस्थांना मास्क उपलब्ध करून दिले आहेत. याचे वाटप शुक्रवारी सायंकाळी अर्जुन बापर्डेकर यांच्या हस्ते मालवण बाजूला कार्यरत ग्रामस्थांना मास्क वाटप करून केले गेले. यावेळी मारुती आचरेकर, शंकर मिराशी, मंदार सरजोशी, रोहीत भिरवंडेकर, सायली आचरेकर, मिनल कोदे, कांबळी, आदी ग्रामस्थ होमगार्ड उपस्थित होते.
