पणदूर येथील सविताश्रमात होणार धान्य वाटप; मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांची माहिती
*💫मालवण दि.१२-:* कोरोना महामारीत मालवण तालुक्यात मनसे पक्षाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतानाच पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधित दि. १४ जून रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुका मनसेच्यावतीने पणदूर येथील सविता आश्रम येथे धान्य वाटप तसेच चौके प्राथमिक आरोग्य केंद्र व कुंभारमाठ येथील शासकीय कोविड केअर सेंटर आणि मालवणच्या ग्रामीण रुग्णालय येथे निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझिंग करण्यात येणार असल्याची माहिती मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिली आहे. कोरोना महामारी काळात तालुक्यात मनसेकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क, पीपीई किट, गरजू रुग्णांना मदत, रुग्णांना फळे वाटप, विविध सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझिंग करणे आदी उपक्रम राबविण्यात आले. अलीकडेच साळेल गावात सार्वजनिक ठिकाणे व ग्रामपंचयात कार्यालयात मनसे कार्यकरर्त्यांकडून सॅनिटायझिंग करण्यात आले. तसेच तौक्ते वादळानंतर देवबाग तळाशील, या गावात खाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणीच्या ग्रामस्थांना काही दिवस टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरविले होते. याच पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप व कोविड सेंटर मध्ये सॅनिटायझिंग असे उपक्रम राबविले जाणार आहेत, असे विनोद सांडव यांनी सांगितले.
