बबन बोभाटे यांचा रणजीत देसाई याच्यावर पलटवार
*💫कुडाळ दि.१२-:* शिवसेना जि. प. गटनेते नागेद्र परब यांचे पक्षातील अस्तित्व आणि त्याचे सामाजिक कार्य बघायचे असेल तर ठेकेदार रणजित देसाई यांनी खासदार कार्यालय किंवा नागेंद्र परब यांच्या कार्यालयात एक दिवस येऊन पहावे, मगच अस्तित्व काय असते ते समजेल असा पलटवार कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी रणजित देसाई यांच्यावर केला आहे. ज्या रणजित देसाई यांनी साधी ग्रामपंचायत निवडणुक लढवली नाही. परंतु, पैशाच्या जोरावर जिल्हा परिषद निवडणूक मात्र लढवली, त्यांना नागेद्र परब यांचे पक्षातील अस्तित्व विचारण्याचा अधिकार नाही असा टोला लगावला आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्स ठेकेदार रणजित देसाई यांनी फुकटची बडबड कमी असा सल्ला देखील यावेळी बोभाटे यांनी देसाई याना दिला आहे.
