*प्रत्येकी १५ हजाराचा जामिनावर करण्यात आली मुक्तता
*💫सावंतवाडी दि.११-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बनेसग घेलडा आणि चंदुभाई हिरपरा ( दोघेही रा. गुजरात) यांना न्यायलयाने प्रत्येकी १५ हजारच्या जामिनावर दोघांची मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २८ मे रोजी बांदा ते सावंतवाडी या रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाने इन्सुली नाका येथे वाहनांची तपासणी करतेवेळी महिंद्रा बोलेरो पिकअप आणि गोवा बनावटीची दारू सह सुमारे १५ लाखापेक्षा जास्त किमतींचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना १ जुन पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १ जुन ला त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
