पर्यटन व्यावसायिकासाठी ऑनलाईन स्वच्छ्ता व अतिथिगृह व्यवस्था व्याख्यान

उद्या ११ वाजता प्रारंभ

मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे निवास व न्याहारी योजना तसेच लॉज व्यवसायिकांसाठी स्वच्छता व अतिथी गृह व्यवस्था याविषयावर दि. ११ जून रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशाच्या पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक संचालक – उपसंचालक वेंकटेशन घट्टारेन, आय.एच. एम. मुंबई दीपिका रेड्डी, पर्यटन विभागाच्या माजी डेप्युटी डायरेक्टर सौ. निला लाड, एमटीडीसी सेक्रेटरी उदय कदम आदी मार्गदर्शन करणार आहेत. तरी व्यवसायिकांनी www.favebook.com/sindhuparyatan तसेच www.sindhudurg-paryatan.com या लिंक द्वारे मार्गदर्शन कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, सचिव ऍड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page