सतिश सावंत यांच्या हस्ते विमा पॉलीसेच वितरण_
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आपल्या अधिकारी,कर्मचारी,यांची ग्रुप मेडीक्लेम विमा हा दि न्यू इंडीया अँश्यूरन्स कंपनी मार्फत उतरविण्यात आला असुन या विमा पॉलीसीचे वितरण जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांच्या हस्ते जिल्हा बँक प्रधान कार्यालय येथे करण्यात आले.यावेळी बँकेचे संचालक अविनाश माणगावकर,आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर,व्हीक्टर डांटस,विकास सावंत,प्रकाश मोर्ये,बँक सीईओ अनिरूध्द देसाई, बँक विमा प्रतिनिधी रामचंद्र ठाकुर, विमा प्रतिनिधी कुडाळ शाखा प्रबंधक सतिश रंजन,पणजी येथील वरिष्ठ अधिकारी सलिल वंजारी,विना प्रतिनिधी सुभाष मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. कोरोना प्रर्दुभाव काळात लॉकडाउन, संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा म्हणून जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सुरू होत्या त्यामुळेच ग्राहकांना सेवा देतांना काही अधकारी,कर्मचारी यांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना प्रर्दुभाव झाला.मात्र बँकेच्या ग्रुप मेडीकल पॉलीसीमुळे कन्रचा-यांना चांगली वैद्यकीय सेवा मिळू शकली.व आर्थिक झळ पोहचली नाही.कोरोना काळात ग्राहक हित विचारात घेउन बँक कर्मचा-यांनी पूर्ण शमतेने ग्राहक सेवा दिली यापध्दल बँकेचे अध्यश,संचालक मंडळ,बँक यानी सर्व कर्मचा-यांचे विषेश कौतुक केले आहे. या विमा पॉलीसी मध्ये बँक अधिकारी/ कर्मचारी त्यांची पती/पत्नी व एक अपत्य यांचा समावेश केल्याने सर्वांना आता विमा सुरशा कवच प्राप्त झाले आहे.सदर विमा पॉलीसीमघ्ये पूर्वीचे आजार,डे वन कवर ,कॅश लेस हॉस्पीटल ईत्यादिचा समावेश असणार आहे.
