आचरा हायस्कूल नजीकच्या पाणंद रस्त्याची श्रमदानाने डागडुजी

*💫मालवण दि.१०-:* आचरा मालवण रोड ते आचरा बाजारपेठला जोडणाऱ्या पांदण रस्त्याचे आचरा वरचीवाडी येथील बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाने डागडुजी करून वाहतूकीस योग्य बनविला. यासाठी श्रमदानाने बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दगड बसवून माती पसरवून वाहतूकीस योग्य बनविला. बालगोपाल मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर उपाध्यक्ष किशोर आचरेकर माजी अध्यक्ष वामन आचरेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते बबन शेटये यांसह सर्व बालगोपाल मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page