कर्मचाऱ्यांना ५ लाखाचे कोरोना विमाकवच

तळेरे ग्रामपंचायतच्यावतीने राबविला उपक्रम

*💫कणकवली ०७-:* कणकवली तालुक्यातील तळेरे ग्रामपंचायतच्यावतीने कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जात असून न्यु इंडिया एंशोरन्स लि. कडून ५ लाखाची कोरोना विमा पाॅलिसी करुन देण्यात आली. तळेरे येथील कोरोना कामकाजात ग्रामपंचायत कर्मचारी महत्वाचा भाग असुन कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायत कडून कर्मचाऱ्यांचा विमा काढण्यात आला, माजी सभापती दिलीप तळेकर व सरपंच साक्षी सुर्वे यांचे हस्ते कर्मचाऱ्यांना विमा पाॅलिसी प्रदाण करण्यात आली.यावेळी उपसरपंच दिनेश मुद्रस ग्रामसेवक युवराज बोराडे ग्राम. सदस्य स्वप्निल वनकर, शैलेश सुर्वे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page