नृत्यपरिषद सिंधुदुर्ग जिल्हा आयोजीत ऑनलाईन नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर

*💫कणकवली दि.०६-:* नृत्यपरिषद महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ऑनलाईन नृत्य स्पर्धेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. लहान गट, मोठा गट आणि खुला गट. संपुर्ण जिल्हय़ातून सुमारे 55 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे. लहान गट, प्रथम क्रमांक- नंदिनी हेमंत बिले.(सावंतवाडी), द्वितीय क्रमांक- निधी आशिष शिरोडकर.(वेंगुर्ला), तृतीय क्रमांक – सांची माधव साटम. (देवगड). मोठा गट, प्रथम क्रमांक- मृणाल अजय सावंत.(कुडाळ), द्वितीय क्रमांक- विद्या मादकाचे.(सावंतवाडी), तृतीय क्रमांक- सानिका चव्हाण.( देवगड). खुला गट, प्रथम क्रमांक- सिद्धीताई आचरेकर.(देवगड), द्वितीय क्रमांक- नम्रताताई विजय वाटवे.(सावंतवाडी), तृतीय क्रमांक- पुजाताई प्रदीप तावडे.( देवगड). विजेते जाहीर करताना नृत्यपरिषद महाराष्ट्रचे उपाध्यक्ष रत्नाकर शेळके, प्रमुख कार्यकारणी सदस्य जतीन पांडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग सहसचिव सागर सारंग, सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष महेश जांभोरे, खजिनदार सौ. आदिती दळवी. सिंधुदुर्ग सचिव रोहीत माने, सावंतवाडी, उपाध्यक्षा पुजा सावंत, कुडाळ उपाध्यक्ष भुषण बाक्रे, मालवण उपाध्यक्षा सौ. श्वेता चव्हाण, कणकवली उपाध्यक्ष योगेश पाटणकर, देवगड उपाध्यक्षा कु. समृद्धि तावडे, नृत्यपरिषद महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राहुल राजदत्त कदम आणि सिंधुदुर्गातील नृत्यकर्मी उपस्थित होते. या स्पर्धेला परीक्षक म्हणून मातोंड गावचे सुपुत्र आदेश एकनाथ वेद्य, , मिनाक्षीताई पोशे , श्री. अभिषेक उर्फ पप्पु गायकवाड लाभले. कार्यकमाचे सूत्रसंचालन भुषण बाक्रे यानीं केले तर आभार योगेश पाटणकर यानीं मानले.

You cannot copy content of this page