*मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे सुपूर्द
*💫सावंतवाडी दि.०६-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी मेडिकल असोसिएशनने १०० पीपी लई किट, २० लिटर सॅनिटायझर, १०० एन-९५ मास्क, ८ फेस शिल्ड, ४ बॅग, ४ स्प्रेएर आणि सर्जिकल ग्लोव्हज आदी साहित्य आज पालिकेचे मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर यांना सुपूर्द केले. सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर यांनी पालिकेमध्ये कार्यरत सफाई कर्मचारी तथा इतर सेवा कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी संरक्षक साहीत्य आवश्यक असल्याचे सावंतवाडी मेडिकल असोसिएशनला कळविले होते. त्यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत सावंतवाडी मेडिकल असोसिएशनने हे साहित्य पालिकेला सुपूर्द केले. या प्रसंगी सावंतवाडी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजेश नवांगुळयांच्या सह, डॉ मिलिंद खानोलकर, डॉ. कश्यप देशपांडे, डॉ. संजय दळवी, आणि पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. या साहित्याच्या उपलब्धतेसाठी डॉ मिलिंद खानोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सावंतवाडी मेडिकल असोसिएशनच्या या मदतीसाठी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आभार व्यक्त केले.
