चौकेत बंद ला उस्फुर्त प्रतिसाद

अत्यावश्यक सेवा वगळता बजारपेठ बंद

मालवण दि प्रतिनिधी गेला महिनाभर चौके गावात तसेच पंचक्रोशीतील अन्य गावात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यातच चौके गावातील प्रतिष्ठित तरुण व्यावसायिक कोरोना संक्रमित होऊन निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर चौके ग्रामपंचायत सनियंत्रण समिती चौकेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला चौके गावात केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद असल्याने गजबजलेले रस्ते सुने सुने झाले होते गेल्या महिन्याभरात चौके आणि परिसरात सुमारे ४० हुन कोरोना रुग्ण सापडले असून चौके प्राथमिक आरोग्य केंद्रासहित चौके ग्रामपंचायत सजगतेने काम करूनही कोरोना रुग्णाची संख्या घटत नाही तसेच चौके प्राथमिक आरोग्य केंद्राने तर वैद्यकीय अधिकारी श्री मिठारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील गावांमध्ये लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली असून संशयित रुग्णांचे स्वब टेस्ट ही केली जात आहे असे असतानाही कोरोना रुग्ण सापडत असल्याने काल शुक्रवार पासून पाच दिवस चौके बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आज दुसऱ्या दिवशी ही चौकेत कडकडीत बंद पाळण्यात आला

You cannot copy content of this page