*💫कणकवली दि.०५-:* कोरणा संक्रमण वाढत असताना आणि लॉकडाऊन नियमांची पायमल्ली होत असल्याने कणकवली पोलिस प्रशासनाबरोबरच नगरपंचायतीने विनाकारण फिरणाऱ्याना दणका दिला आहे. सकाळी 11 वाजल्यानंतरही बिनधास्तपणे फिरणाऱ्याची कणकवली पोलीस पथकाने कसून चौकशी केली. तर आरोग्य पथकाने दुपारपर्यंत 66 जणांची रॅपिड टेस्ट केली. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव असला तरीही कणकवली शहर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांनी मोकाट फिरणाऱ्यांची चौकशी सुरू ठेवली आहे. या पोलीस पथकात सिताराम सावंत,सहाय्यक पोलीस प्रमोद सुर्वे, महिला पोलीस निलम पवार, दिपाली पाटील, स्मिता माने, पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, वाहतूक पोलीस चंद्रकांत माने, वाहतूक पोलीस संदेश आबिटकर, नगरपंचायत कर्मचारी रवि महाडेश्वर, होमगार्ड प्रशांत वळंजु आदी सहभागी आहेत.
कणकवलीत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका; ६६ जणांची रॅपिड टेस्ट…
