Headlines

एसआयआर फॉर्म भरण्याच्या उपक्रमास नगरसेविका पूनम चव्हाण यांचे सहकार्य

मालवण (प्रतिनिधी)

एसआयआर फॉर्म मतदार सखोल निरीक्षण पुनर्यादी या शासनाच्या कार्यक्रमा अंतर्गत मतदार आपली जबाबदारी या अनुषंगाने नगरसेविका तथा स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी आपल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये नगरसेविका आपल्या दारी या संकल्पनेतून एसआयआर फॉर्म भरणे उपक्रमास निवडणूक अधिकारी बीएलओ यांना सहकार्य करत आहेत.

निवडणुक विभागाच्या वतीने मतदार यादीची विशेष आणि सखोल पडताळणी प्रक्रिया सर्वत्र सुरु आहे. मतदार यादीत नावे जोडणे. नाव रद्द करणे. मृत पावलेल्या, स्थलांतरित झालेल्या किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणे, बीएलओ घरी येऊन कुटुंबाची आणि मतदारांची माहिती तपासून ‘एसआयआर फॉर्म’ भरून घेतले जात आहेत. या प्रक्रियेत सहकार्य या भावनेतून नगरसेविका पुनम चव्हाण यांनी नगरसेविका आपल्या दारी ही विशेष मोहीम सुरु केली आहे.

You cannot copy content of this page