⚡सावंतवाडी ता.२१-: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त रविवार
दि . १९ .०७ . २०२६ रोजी चेस अकॅडमी कणकवली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडी प्रशालेतील इयत्ता १०वी तील विद्यार्थी कु . वसंत संदीप गवस याने प्रथम क्रमांक व इयत्ता २ री तील कु . सानवी हरिशचंद्र गवस हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल कु. वसंत व कु . सानवी यांना आयोजकांच्या वतीने सन्मानपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असून, त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही बुद्धिबळ खेळाकडे प्रेरणा मिळणार असल्याचे मत प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, पर्यवेक्षिका श्रीम. मारिया पिंटो , क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक कार्यकारिणी समिती पदाधिकारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
