⚡सावंतवाडी ता.२२-: शेर्ले बाबरवाडी येथे आपल्या ताब्यातील बस सावंतवाडी- शेर्ले मार्गे कास जाणा-या डांबरी रस्त्यावर विशिष्ठ परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अविचाराने अतिवेगाने हयगयीने व निष्काळजीपणे बस चालवुन समोरुन येण-या मोटरसायकल स्वार व पाठीमागे बसलेला इसम अशा दोघांना ठोकर देऊन दोघांच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याचा आरोपातुन संशयित सुनिल अशोक धुरी याची सावंतवाडी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
संशयितातर्फे नोटरी व ॲड. सिध्दार्थ माधव भांबुरे यांनी काम पाहिले. १९/११/२०१९ रोजी दुपारी १३.१५ च्या सुमारास गावमौजे शेर्ले बाबरवाडी येथे सावंतवाडीकडुन येणारी एस.टी. महामंडळाच्या चालकाने दुचाकी ला धडक दिल्याच्या फिर्यादीनुसार संशयिता विरोधात भा.द.वि. कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, व मोटरवाहन अधिनियम १९८८ कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षीदारांच्या जबानीतील विसंगती व आरोपीतर्फे वकीलांनी न्यायालयासमोर आणुन या गुन्हयाशी सुनिल अशोक धुरी याची काहीही चुक व संबंध नसल्याचा बचाव संशयितांचे वकीलांनी मांडाला. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने संशयित भरत सुरेश कुबल याची या केसमधुन निर्दोष मुक्तता केली.
