Headlines

आरोंदा येथील श्री सातेरी भद्रकाली पंचायतन संप्रोक्षण विधी ७ ते १० मे रोजी…

⚡सावंतवाडी ता.०६-: आरोंदा श्री सातेरी भद्रकाली पंचायतन संप्रोक्षण विधी ७ मे १० मे रोजी साजरा होणार असून,या निमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि. ७ मे रोजी,
सकाळी ७ ते १ मंगलाचरण, प्रायश्चित विधी, गोपूजन, विष्णूपूजन, पंचगव्य होम, देवतांना निमत्रंण, शांतिपाठ, संकल्प, गणेशपूजनादि नांदिश्राद्ध, पुण्याहवाचन, आचार्यवरण, आचार्यकर्म, प्राकारशुद्धी, उदकशांत सायं. ४ वा. राक्षोघ्न हवन.

शुक्रवार दि. ८ मे रोजी
सकाळी ७ ते २- मंगलाचरण, देवतांचा शुद्धीकरण विधी सुरुवात, कौतुकबंध, ब्रह्मादि मंडळ देवतांची स्थापना, अग्निस्थापना, ग्रहस्थापना, वास्तुहोम, ग्रहहोम.

शनिवार दि. ९ मे रोजी
सकाळी ७ ते २ मंगलाचरण, आवाहित देवतांची पूजा, प्रधान हवन, तत्वहवन, मुख्य पंचायतन देवतांवर तत्वन्यास, महापूजा, देवी अथर्वशीर्ष जप.

रविवार दि. १० मे २०२६
सकाळी ७ ते १२ मंगलाचरण, आवाहित देवतांची पूजा, अग्निअर्चन, देवतांची महापूजा, पुजांग होम, बलिदान, महापूर्णाहुति, उत्तरांग हवन व कर्म अभिषेक, विभूतीचंदन, कर्म समाप्ति, आरती, गा-हाणे, महाप्रसाद.

दि. ७ मे ते १० मे पर्यंत रोज दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून ,कार्यक्रम पुढील प्रमाणे:-

गुरूवार दि. ७ मे रात्रौ ९ वाजता हेळेकर दशावतार नाट्यमंडळ, कारीवडे यांचा नाट्यप्रयोग “गणबिंदु घुबड”

शुक्रवार दि. ८ मे रात्रौ ९ वाजता “डबलबारी कार्यक्रम” बुवा-गुंडु सावंत व बुवा समीर कदम,
पखवाज – विराज बावकर, तबला संकेत गोसावी.

शनिवार दि. ९ मे रात्रौ ९ वाजता श्री गणेश दशावतार नाट्यमंडळ, वायरी मालवण बांचा “दशावतार कार्यक्रम”

रविवार दि. १० मे २०२६रात्रौ ७.३० वा. स्वतंत्र तबला वादन, गोवा यांचा “नादब्रह्म कार्यक्रम”.

रात्री ९ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग “महाकालेश्वर लिंगस्थापना”.

तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
व्यवस्थापक देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ आरोंदा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page