गावागावातून मिळतोय गोवेकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡सावंतवाडी ता.३०-: मळेवाड पंचायत समिती मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या , अधिकृत उमदेवार मनिषा गोवेकर यांनी आजगाव येथील श्री देव वेतोबा मंदिरात श्रीफळ ठेवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी आपण केलेल्या लोकहिताच्या कामाच्या जोरावर, निवडणूक लढवत असून,पक्षाने आपल्यावर ठेवलेला विश्वास ,दिलेली जबाबदारी आपण आपल्या मतदारांच्या,कार्यकर्त्यांच्या आशिर्वादाच्या जोरावर लढवत असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी श्री देव वेतोबा चरणी श्रीफळ ठेवून आपल्या प्रचाराला सुरवात केली. गावागावात कार्यकर्त्यांसह त्यांनी भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली असून त्यांना गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .गोवेकर ह्या माजी पंचायत समिती सदस्य असून,आपल्या कारकीर्दीत गावागावात विविध विकास कामे केली आहेत.प्रचार शुभारंभी प्रसंगी यावेळी महाविकास आघाडी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी मतदान करून आपल्याला निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
