पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकणार…

हरी खोबरेकर:माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई देणार..

⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई देणार आहोत. आमचे उमेदवार ठामपणे पक्षाबरोबर असून मालवण पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर ठाकरे शिवसेनेचाच झेंडा फडकणार आहे, असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्री. खोबरेकर म्हणाले, ठाकरे शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांनी अपक्ष म्हणून काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पक्षाकडून त्यांची समजूत काढण्यात आल्यानंतर त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. यामुळे सर्व कार्यकर्ते आणि उमेदवार एकसंघपणे पक्षाचे अधिकृत उमेदवार विजयी करण्यासाठी सज्ज झाले आहेत, असेही श्री. खोबरेकर म्हणाले.

You cannot copy content of this page