⚡बांदा ता.२७-: कणकवली येथे आज आयोजित भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ता मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे मोपा गोवा विमानतळावर प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खातीब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, प्रदेश सचिव अमृत मारणे, देवा शेटकर, पराशर सावंत, राज वरेकर, प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे मोपा विमानतळावर जंगी स्वागत…
