आचरा ग्रामपंचायत तर्फे देवगड रस्त्याला बसविण्यात आलेल्या सौर पथदिव्यांची अज्ञाताकडून चोरी…!

मालवण दि प्रतिनिधी
आचरा ग्रामपंचायततर्फे देवगड रस्त्यावर पारवाडी येथे बसविण्यात आलेल्या सौर पथदिव्यांचे पोल जमिनीवर पाडत तीन पथदिव्यांची बॅटरी व पॅनेल चोरून नेण्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

याबाबत माहिती समजताच शुक्रवारी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्य चंदू कदम, ग्रामपंचायत लिपिक नरेश परब आदी उपस्थित होते.याबाबत आचरा ग्रामपंचायत तर्फे आचरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आचरा देवगड रस्त्यावर ग्रामपंचायत तर्फे सौर पथदिवे बसविण्यात आले होते. त्यामुळे पारवाडी नदि परीसर उजळून गेला होता. गुरुवारी रात्री अज्ञाताने यातील तीन पथदिवे बसविलेले लोखंडी पोल जमिनीवर आडवे पाडत पथदिव्यांची बटरी व सोलर पॅनल चोरुन सुमारे ६६००० हजाराचे नुकसान केले.याबाबत शेती राखण्यासाठी आलेले शेतकरी जितेंद्र पळसंबकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री एक दिड वाजण्याच्या सुमारास या भागात टुव्हीलर आल्याचे त्यांना लांबून दिसले होते.कोणीतरी प्रवाशी असतील म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगितले.याबाबत आचरा ग्रामपंचायत तर्फे लेखी तक्रार दिल्याचे सरपंच फर्नांडिस यांनी सांगितले.

You cannot copy content of this page