जोरदार शक्तिप्रदर्शन करत थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज; कार्यकर्त्यांची मोठी गर्दी …
⚡सावंतवाडी ता.२४: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे ह्या बंडखोरीच्या पवित्र्यात असून, त्यांची नाराजी दूर करण्यात वरिष्ठाना अपयश आले आहे. थोड्याच वेळात त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांचा अर्ज भरला जाणार असल्याचा दावा खुद्द घारे परब यांनी आता केला.
त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये बंड हे अटळ असून त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता जरी अर्चना घारे परब उमेदवारी अर्ज दाखल करत असल्या तरी त्या उमेदवारी अर्जावर ठाम राहणार की ४ तारखेला माघार घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
