⚡बांदा ता.१४-: मडुरा येथे रस्त्यावर उडीसा येथील परप्रांतीय युवक हा गंभीर जखमी अवस्थेत आढळला. येथे भजनासाठी जाणाऱ्या स्थानिक युवकांना जखमी अवस्थेतील युवक दिसल्यानंतर त्यांनी याची कल्पना तात्काळ बांदा पोलिसांना दिली. बांदा पोलिसांनी जखमीला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
मडुरा रस्त्यावर आढळला जखमी अवस्थेत परप्रांतीय युवक …!
