अज्ञात वाहनांच्या धडकेत इसमाचा मृत्यू…!

⚡मालवण ता.१३-: मालवण तालुक्यातील राठिवडे मधलीवाडी येथील चंद्रशेखर आप्पा धुरी (वय ४०) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात श्री चंद्रशेखर धुरी हे जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बेळणे ते राठिवडे जाणारया रस्त्यावर भावई मंदिरासमोर घडली.

आचरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठीवडे मधलीवाडी येथे राहणारे चंद्रशेखर आप्पा धुरी यांना दारू पिण्याचे व्यसन होते काल गुरुवारी दि १२सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बेळणे ते राठिवडे जाणारया रस्त्यावर भावईअसणाऱ्या मंदिरासमोरील रस्त्यावर चंद्रशेखर धुरी यांना एका अज्ञात वाहनाने ठोकर देत ते वाहन निघून गेले याबाबतची खबर गणेश चिंतामणी धुरी वय 55 रा.राठिवडे मधलीवाडी यांनी आचरा पोलीस स्टेशनला दिली याबाबत आचरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरळकर करत आहेत.

You cannot copy content of this page