कुंभारमाठ धनगरवाडी महिलांना पावसापासून संरक्षण साहित्याचे वाटप…

मालवण (प्रतिनिधी)

महिलांसाठी कार्यरत असलेल्या मालवण मधील माय माऊली महिला सबलीकरण संस्थेतर्फे मालवण कुंभारमाठ धनगरवाडी येथील धनगर समाजातील महिलांना शेती व इतर पावसाळी कामांमध्ये पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी प्लास्टिक खोळ वितरित करण्यात आले.

माय माऊली महिला सबलीकरण ही संस्था महिलांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत असून धनगर समाजातील महिलांना कोणत्या समस्या उद्भवल्यास त्यांनी मदतीसाठी संस्थेशी संपर्क करावा, असे आवाहन यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. फॅनी फर्नांडिस यांनी केले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष वैशाली शंकरदास, कार्याध्यक्ष शर्मिका लुडबे, सचिव मिताली मोंडकर, खजिनदार राधिका मोंडकर, मनीषा गावकर आदी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page